NEWS UPDATES

Hon. Hanumant Motiram Jagtap (Nanasaheb)

मा. हनुमंत मोतीराम जगताप ( नानासाहेब)

अध्यक्ष,

लोकविकास सामाजिक संस्था,

महाड रायगड.

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात आपल्या संस्थेच्या एम एम जगताप कॉलेज  आर्टस, सायन्स व कॉमर्स महाड,महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या तुम्हा सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मी मनापासून स्वागत करतो. नव्या उत्साहाने, उमेदीने व पुढचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही सर्वांनी शैक्षणिक वाटचालीला सुरुवात केली आहे. त्यासाठी मी तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात गेली १२ वर्ष उल्लेखनीय असे कार्य करणाऱ्या आपल्या महाविद्यालयाचा नावलौकिक केवळ रायगड जिल्ह्यातच नाही, तर मुंबई विद्यापीठात आदर्श महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. त्याच महाविद्यालयाचे एक घटक होताना तुम्हा विद्यार्थ्यांना मिळालेल्या उच्च शिक्षणाच्या या संधीचा योग्य तो उपयोग तुम्ही करून घ्यायचा आहे.

सन २००८-०९ मध्ये तत्कालीन आमदार मा.श्री. माणिकराव मोतीराम जगताप (आबासाहेब)यांच्या नेतृत्वाने या महाविद्यालयाची निर्मिती झाली. नगरपरिषदचे तत्कालीन सर्व पदाधिकारी, नगरसेवक, सदस्य, महाडमधीलप्रतिष्ठित नागरिक यांचे बहुमोल सहकार्य महाविद्यालयाच्या स्थापनेमध्ये लाभले. महाविद्यालयाची आता हळूहळू रोप्यमहोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत सर्वच क्षेत्रात महाविद्यालयाने केलेली नेत्रदीपक प्रगती समाधानकारक व आनंद देणारी आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा व संशोधन क्षेत्रात सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश गौरवास्पद आहे. उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात होत असलेले बदल व संधी लक्षात घेऊन त्यादृष्टीने आपण महाविद्यालयात अनेक नव्या सुधारणा करीत आहोत. ज्ञान आणि माहितीबरोबरच कौशल्याधिष्ठित उपयोजित असे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. नव्या बदलांना सामोरे जाताना उद्याचा सक्षम आणि आदर्श नागरिक येथून घडावा हीच अपेक्षा आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांना रोजगार उपलब्ध होऊन आयुष्यात ते सक्षमपणे उभे राहू शकतील अशा प्रकारचा प्रयत्न आपण करीत आहोत.

कोरोना – कोवीड १९ या जागतिक महामारीचा सर्वच क्षेत्रावर जसा दूरगामी परिणाम झाला, तसे शिक्षणक्षेत्रही त्यातून सुटलेले नाही. देश आणि राज्य पातळीवर सर्वांनी मिळून केलेल्या एकजुटीच्या प्रयत्नाने काही प्रमाणात त्यावर आपण मात केली आहे. सर्वच घटकांनी एकजुटीने कोरोना संकटाशी केलेला सामना सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. भविष्यात अशी नवी-नवी संकटे व आव्हाने सातत्याने येत राहतील, पण तरुणाईने त्याला सक्षमपणे तोंड देण्यासाठी मानसिकदृष्ट्या सतत तयार रहायला हवे. आपण त्यासाठी सजग व सक्षम राहू हा विश्वास आहेच. महाविद्यालयाच्या वाटचालीत संस्थेतील माझे सर्व सहकारी, सदस्य, मार्गदर्शक, नागरिक व पालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक – शिक्षकेतर सेवकवृंद आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी आपण केलेल्या सहकार्याबद्दल मी सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. नवीन शैक्षणिक वर्षात उत्तम अभ्यास करा. ज्ञानसंपन्न व्हा. तुम्हाला नक्कीच उज्ज्वल भविष्य आहे. धन्यवाद !! शैक्षणिक प्रगतीसाठी व पुढील यशाकरिता आम्हा जगताप परिवार कडून व सर्वांकडून मनःपूर्वक शुभेच्छा लोकविकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा.हनुमंत जगताप (नानासाहेब) हे  सदैव चांगुलपणाच्या मार्गावर चालणारे सोनेरी मनाचे आहे.त्यांनी जीवनाचे साधे पण मौल्यवान तत्वज्ञान सांगितले. ते नेहमी म्हणतात की, प्रत्येकामध्ये चांगले शोधा आणि नकारात्मकऐवजी सकारात्मक विचार करा. आणि आनंदी जीवन जगा. त्यांची जीवनगाथा ही एका व्यावसायिकाची यशोगाथा आहे. कॉ.माणिकराव जगताप( साहेब यांचे कडून राजकारणाचे बाळकडू त्यांना मिळाले आणि आता जगताप कुटुंबाचा एक आधार म्हणून ते काम पाहात आहे. शौक्षणिक कार्याबरोबर समाजातील बांधिलकी म्हणून समाजासाठी ते बहुमोल कार्य करीत आहे सर्वार्थाने गोरगरिबांच्या कमीत कमी शिक्षणाच्या गरजा भागवाव्यात या विचाराने आपले सर्वस्वपणाला लावून  शिक्षण क्षेत्रात क्रांती करीत आहे.

About :-

  • The Lokvikas Samajik Sanstha’s Mahad was established in 2008 with a mission to impart education and it’s important in Mahadand the Empowerment of students for sustainable development by imparting knowledge, information, understanding, ethics and morality through education in the konkan Mofussial, hilly and backward area. It combines a responsibility for the advancement and dissemination of knowledge.
  • The sanstha has to its credit the starting of first college in Mahad way back in 2009which offers courses in Arts, Commerce as well as Science. In last 13 years of its existence, in addition to the college, it has started M.M.Jagtap English Medium School and Junior College of Commerce, Science, Thus it offers an extensive range of academic programs at primary, secondary & higher levels of education.Institution   commits   to   provide   quality education to promote intellectual, social and cultural enthusiasm amongst its learner and their empowerment to become a good citizen in the emerging knowledge to the society.
  • The M.M.Jagtap college of Arts, Science and Commerce Mahad is functioning in hilly area of Mahad Dist. Raigad since July 2009. The college is tirelessly functioning to bring the first learning generation of this hilly area into the main stream of higher education particularly from socially deprived sections of the society and especially from economically backward class and minority to take up higher education.
  • It is a multiple faculty college affiliated to University of Mumbai. Our college faculties are experienced, committed & fully qualified. We have a strong and effective teaching, learning and evaluation system. In the new education process, there is a shift of the system of education from teacher centred to student centred. Our Teachers are using modern teaching aids with a number of innovative ideas for enhancing and challenging the learning potential of the student. They participate and present papers in international, national, state level conferences, seminars and workshops. They also work in the capacity of paper setters, moderators, examiners, resource persons and on various university/ College committees.
  • The College has well furnished & equipped classrooms, computer lab, administrative office, library with internet facility, staff room, girl’s common room, canteen facility, playground etc. The college also ensures physical, social and emotional development of students through academic, co–curricular and extra-curricular activities through the departments of Marathi Literary Association मराठीभाषामंडळ, Career Counselling Cell& Placement Cell, Special Backward Students Cell (B.C. Cell)Sports, Science forum, Cultural Association, National Service Scheme (N.S.S.), Women Development Cell, Department of Lifelong Learning and Extension (DLLE) etc.

Copyrights 2025 © M.M. Jagtap College of Arts, Science & Commerce Mahad-Raigad

error: Content is protected !!